Sangram Jagtap | नगर : राहुरी परिसरातील बोगस डॉक्टर असलेल्या तन्वीरने वैद्यकीय ज्ञान नसताना रुग्णांच्या शस्त्रक्रियेत पुढाकार घेतला. पोलीस व जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली. असे अनेक डॉक्टर उदयाला येत असलेले आपल्याला पहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून औषधोपचार केल्याचे भासवण्यात येते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियाच्या नादी न लागता डॉक्टरांच्या पदव्या अधिकृत आहेत की नाही हे तपासले पाहिजे. वैद्यकीय पदवी नसेल तर त्याला औषधोपचार करण्याची वैद्यकीय कायद्यानुसार परवानगी नसते. या मागे जिहादी प्रवृत्ती असते. असे प्रकार फक्त राहुरीतच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध भागात दिसून येतात, असा आरोप आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केला.
हे वाचा – बेलवंडी पोलिसांनी पकडला ‘श्रीगोंदा’ हद्दीतील गुटखा; नूतन एसपींच्या आदेशाने कारवाई
आरोपींचे देशद्रोही बंटी जहागीरदारशी संबंध ( Sangram Jagtap)
राहाता तालुक्यातील अवैध गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणीतील काही जण तसेच श्रीरामपूर शहरातील प्रभाग दोन मध्ये डॉ. राज शेख याला गर्भपाताच्या औषधासंदर्भात अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे देशद्रोही बंटी जहागीरदारशी संबंध आहे की नाही, याची चौकशी व्हायला हवी. पोलीस व आरोग्य विभागाने यादृष्टीनेही तपास करायला हवा. जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचीही चौकशी लावावी लागेल. संगणमत शिवाय असे प्रकार होऊ शकत नाहीत.
नक्की वाचा : शनी अमावस्येनिमित्त मढीत उसळला नाथभक्तांचा जनसागर; दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
बोगस डॉक्टरांना कोण फंडिंग करत ( Sangram Jagtap)
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर पोलीस कारवाई करतात, हे योग्य नाही. अशा बोगस डॉक्टरांना कोण फंडिंग करत, हेही तपासले जायला हवे. कारण हा मानवी जीवनाशी खेळ आहे. आरोपींनी मानवी जीवनाशी खेळ चालवला आहे. या विरोधात डॉक्टरांच्या संघटनांनी एकत्र होऊन लढा द्यायला हवा, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.



