Suspicious Body | कोपरगाव : कोपरगाव (Kopargoan) तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारातील तीनचारी परिसरात एका अज्ञात इसमाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह (Suspicious Body) आज (ता. १७) सकाळी आढळून आला. त्यामुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार सदर मयत इसमाच्या देहावर ठिकठिकाणी जखमा असल्याचे समोर आल्याने हा प्रकार अपघात, घातपात की अन्य काही, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पोलीस पथकाने या संदर्भात तपास सुरू केला आहे.
हे वाचा – बेलवंडी पोलिसांनी पकडला ‘श्रीगोंदा’ हद्दीतील गुटखा; नूतन एसपींच्या आदेशाने कारवाई
भीतीचे वातावरण (Suspicious Body)
संबंधित इसमाचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाणेचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर होमगार्ड अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
नक्की वाचा : शनी अमावस्येनिमित्त मढीत उसळला नाथभक्तांचा जनसागर; दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
घातपाताची शक्यता (Suspicious Body)
मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, मृतदेहावरील प्राथमिक जखमांच्या माहितीनंतर घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, हा अपघाती मृत्यू आहे की इतर कोणता प्रकार, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हे पहा – लोखंडांवर घाव घालणाऱ्या हातांनी मिळविले युपीएससीत यश; अक्षय पवार यांची प्रेरणादायी यशोगाथा
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



