Kiran Rao : भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव

Kiran Rao : भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव

0
Kiran Rao : भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव
Kiran Rao : भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव

Kiran Rao : नगर : जिल्ह्यातील अनेक गावात उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागत होती. मात्र, पाणी फाउंडेशनच्या (Paani Foundation) विविध जलसंधारण (Water Conservation) उपक्रमांमुळे गावातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून आज गाव सुजलाम-सुफलाम बनले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची उपलब्धता वाढली असून उत्पादनातही वाढ झाली आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि श्रमदानातून उभ्या राहिलेल्या विकासकामांचे कौतुक करत भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट ही चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनच्या सहसंस्थापिका किरण राव (Kiran Rao) यांनी केले आहे.

Kiran Rao : भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव
Kiran Rao : भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव

नक्की वाचा : इतिहास जगलेला आवलिया भूषण देशमुख

किरण राव यांची आदर्श गाव मांजरसुंबा येथे सदिच्छा भेट

पाणी संवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडवून आणणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सहसंस्थापिका किरण राव यांनी रविवारी (ता.७) अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे सदिच्छा भेट देत गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. त्यांच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गावकऱ्यांनी जलसंधारणामुळे झालेल्या बदलांची दिली माहिती (Kiran Rao)

यावेळी किरण राव यांनी गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या जलसंधारण, शेती विकास आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रमांची माहिती घेतली. तसेच पाणी फाउंडेशन, कृषी विभाग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी गटाबाबत मार्गदर्शन केले. तसेच शिवछत्रपती शेतकरी समूह गट, गर्वगिरी महिला शेतकरी गट, निप्ती येथील राम रहीम शेतकरी संघ, व गुप्ता येथील संभाजी राजे शेतकरी गट, तसेच शिव महिला शेतकरी गटाच्या कामकाजाची पाहणी करून सदस्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनी जलसंधारणामुळे झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती त्यांना दिली.

भेटीदरम्यान आदर्श गावच्या सरपंच रूपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, ग्रामसेवक सारिका वाळुंज, सहाय्यक कृषी अधिकारी सुविधा वाणी, पाणी फाउंडेशनचे समन्वयक विक्रम पाठक, ग्रामस्थ विलास भुतकर, योगेश कदम नामदेव कदम, किरण कदम, प्रदीप कदम, बाळासाहेब कदम, अर्चना कदम, छाया कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी गावाच्या विकासाचा प्रवास आणि पाणी फाउंडेशनच्या योगदानाबद्दल माहिती दिली.

Kiran Rao : भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव
Kiran Rao : भविष्यातही जलसंवर्धन व शेतकरी गट चळवळ अधिक बळकट व्हावी : किरण राव

गर्भगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले मांजरसुंबा हे गाव एकेकाळी तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त होते. उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागत होती. मात्र, पाणी फाउंडेशनच्या विविध जलसंधारण उपक्रमांमुळे गावातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून आज गाव सुजलाम-सुफलाम बनले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याची उपलब्धता वाढली असून उत्पादनातही वाढ झाली आहे.

किरण राव यांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचे आणि श्रमदानातून उभ्या राहिलेल्या विकासकामांचे कौतुक करत भविष्यातही जलसंवर्धन शेतकरी गट ही चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. त्यांच्या भेटीमुळे गावाच्या विकासाला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. जालिंदर कदम, रंजन कदम आदि शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.