Vaibhav Suryavanshi : १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीसाठी बीसीसीआयने बदलला ‘तो’ महत्वाचा नियम

0
Vaibhav Suryavanshi : १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीसाठी बीसीसीआयने बदलला 'तो' महत्वाचा नियम
Vaibhav Suryavanshi : १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीसाठी बीसीसीआयने बदलला 'तो' महत्वाचा नियम

नगर: आयपीएल २०२६ मध्ये (IPL 2026) राजस्थान रॉयल्स संघात आपल्या स्फोटक खेळीने चर्चेत येणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा (Vaibhav Suryavanshi) भारतीय टी २० संघात समावेश करण्यात आला आहे. लहान वयातच मिळालेल्या या प्रचंड आंतरराष्ट्रीय यश आणि प्रसिद्धीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने एक संवेदनशील आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वैभवसाठी बीसीसीआयने एक नियम बदलला (BCCI changed the rules) आहे. आता हा नियम नेमका काय ते जाणून घेऊ…

नक्की वाचा : आता MPSC परीक्षेचे नियम झाले कडक; कारण नेमकं काय?

वैभव सूर्यवंशीसोबत दोन विशेष व्यक्ती असणार (Vaibhav Suryavanshi)

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वैभव सूर्यवंशी अजून खूप लहान आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वयात, अचानक मिळालेली प्रसिद्धी, माध्यमांचे लक्ष आणि वरिष्ठ संघाचा प्रचंड दबाव हाताळणे हे कोणत्याही मुलासाठी मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते. त्यामुळेच बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की, वैभव सूर्यवंशीचे आई-वडील देखील इंग्लंड आणि आयर्लंडच्या आगामी दौऱ्यावर टीम इंडियासोबत प्रवास करतील. आई-वडिलांच्या उपस्थितीमुळे वैभवला घरच्यासारखे वातावरण मिळेल आणि त्याला परदेश दौऱ्याच्या नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होईल. असाच एक प्रकार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत घडला आहे.

अवश्य वाचा : आमिष दाखवून वृद्ध महिलेची फसवणूक; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सचिन तेंडुलकरच्या वेळी नेमकं काय घडलं? (Vaibhav Suryavanshi)

जेव्हा १९८९ मध्ये सचिन तेंडुलकर भारतासाठी पदार्पण करण्यासाठी पाकिस्तानला गेला होता, तेव्हा त्याचा मोठा भाऊ अजित त्याच्यासोबत गेला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर फक्त १६ वर्षांचा होता. याच संदर्भात, बीसीसीआयने वैभव सूर्यवंशीसाठीही हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी माध्यमांना सांगितले आहे की, “तो एक लहान मुलगा आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या पालकांना त्याच्यासोबत आयर्लंड आणि इंग्लंडला प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून ते त्याच्यासोबत राहू शकतील आणि त्याला नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करू शकतील. बोर्ड त्यांचा सर्व खर्च उचलेल.”

भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्यांवर आणि जास्त दिवस चालणाऱ्या मॅचेस दरम्यान कुटुंबाच्या उपस्थितीबाबत बीसीसीआयने कठोर नियम लागू केले आहेत. खेळाडू संपूर्ण दौऱ्यात आपल्या कुटुंबाला किंवा पत्नीला सोबत ठेवू शकत नाहीत. जर एखादी मालिका किंवा स्पर्धा ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ चालली, तर कुटुंबातील सदस्य खेळाडूंसोबत फक्त १४ दिवस राहू शकतात. मात्र बीसीसीआयने वैभव सूर्यवंशीसाठी नियमांमध्ये बदल केला असून संवेदनशीलता दाखवली आहे.