
AMC : नगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने पावसाळापूर्व दक्षता उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता व नाला सफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याअंतर्गत सक्कर चौक ते चाणक्य चौक या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पावसाळी गटारींमध्ये साचलेली माती, प्लास्टिक पिशव्या, कचरा व अन्य अडथळे हटविण्याचे काम आज (ता. २०) करण्यात आले.
हेही वाचा : गांधी मैदान परिसरात तरुणावर चाकू हल्ला; कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
विशेष मोहीम
दीर्घकाळ साचलेल्या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून गटारी स्वच्छ केल्या. यामुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मदत होणार असून रस्त्यांवरील पाणी साचण्याची समस्या कमी होण्यास हातभार लागणार आहे.
नक्की पहा : खासदार नीलेश लंके यांचा वाघासोबत फेरफटका
नागरिकांना आवाहन (AMC)
अहिल्यानगर महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळी गटारी, नाले व सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लास्टिक, बांधकाम साहित्य अथवा इतर वस्तू टाकू नयेत. गटारींमध्ये कचरा टाकल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडतो व पावसाळ्यात पाणी तुंबणे, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणे तसेच आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.


