Radhakrishna Vikhe : नव्या चारही आमदारांवर जिल्ह्या विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्याची जबाबदारी : मंत्री राधाकृष्ण विखे

भाजपाच्या ४ नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार

0
Radhakrishna Vikhe : नव्या चारही आमदारांवर जिल्ह्या विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्याची जबाबदारी : मंत्री राधाकृष्ण विखे
Radhakrishna Vikhe : नव्या चारही आमदारांवर जिल्ह्या विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्याची जबाबदारी : मंत्री राधाकृष्ण विखे

Radhakrishna Vikhe : नगर : जिल्ह्यातून एकाच वेळी चार आमदार विधान परिषदेवर (Legislative Council) जाने ही मोठी ऐतिहासिक घटना आहे. या नव्या आमदारांच्या माध्यमातून जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळाले आहे. जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत काम करून जिल्हा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. भारतीय जनता पार्टी (BJP) ही योग्य व्यक्तिला योग्य संधी देणारी आहे. राज्यातील महायुती सरकार खूप विशाल आहे. त्यामुळे जिल्ह्यात विकासाची गंगा कायम खळखळ वाहणार आहे, असे प्रतिपादन . राज्याचे जलसंपदा मंत्रीतथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी केले.

नक्की वाचा : डॉ. सुजय विखेंनी त्याग केला म्हणून आम्हाला संधी; आमदार विवेक कोल्हे, सत्कार समारंभात रंगली जुगलबंदी

कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित

नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भाजपाच्या ४ नवनिर्वाचित आमदारांच्या नागरी सत्कार समारंभ आयोजन शुक्रवारी करण्यात आले. होते. या सत्कार सोहळ्यात नुकत्याच झालेल्या विधान परीषदेच्या निवडणुकीत अहील्यानगरचे भूमीपुत्र व विधान परिषदेचे नूतन सदस्य आ.सुनिल कर्जतकर, आ.विवेक कोल्हे व आ.प्राजक्त तनपुरे तसेच राहिरी विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आ.अक्षय कर्डिले यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अध्यक्ष स्थानाहून मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जिल्ह्यातील महायुतीचे आ.संग्राम जगताप, आ.काशिनाथ दाते, आं.अमोल खताळ, आ.विठ्ठल लंघे, आ.विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहीते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व दक्षिण दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, महायुतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विरोधक टीका करत बुद्धिभेद करत आहे (Radhakrishna Vikhe)

मंत्री विखे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील महत्वच्या विकास कामांसाठी सुमारे २६२४ कोटी रुपयांचा मोठा विकास निधी दिला आहे. यातून निळवंडे, धरण साकळाई योजना, ताजनापुर लिफ्ट, वांबोरी चारी, मुळा, गोदावरी कालवा अशी मोठी प्रकल्प मार्गी लागली आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईपोटी १६०० कोटी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३५ हजार कोटी रुपये राज्य सरकारने दिले. जिल्ह्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात एव्हढा मोठा निधी कधीही मिळाला नाहीये. या सर्व कामांची व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. ही विकास कामे नागरिकांना कळले पाहिजे. विरोधक टीका करत बुद्धिभेद करत आहेत. पंढरपूर येथील जिल्ह्यातील एक आमदार उपोषणाची नौटंकी करत आहेत.

आमदारांची संख्या वाढणार

सभापती राम शिंदे म्हणाले, नवनिर्वाचित आमदारांपैकी तीन आमदार युवा आहेत. त्यामुळे त्यांनी अपेक्षांची पूर्तता करावी. जिल्ह्यातील आमदारांची संख्या आता १८ वर गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढणार आहे. नवनिर्वाचित आमदार सुनील कर्जातकर यांनी पक्षाचे संघटन मजबूत करत आयुष्यभर निष्ठेने काम केले. म्हणूनच त्यांना पक्षाने संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत निष्ठेने काम करत राहावे. पक्ष निश्चितच उचित दखल घेईल. भविष्यात राज्यात डी लिमिटेशन मुळे मतदार संघाची रचना बदलत संख्याही वाढणार असल्याने आमदारांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे अनेकांना संधी मिळण्याची शक्यता आहे, येणाऱ्या झेडपी व पंचायत समिती निवडणुकांमध्येही याच पद्धतीने विजय मिळवून महायुतीचा झेंडा फडकवा, असे आवाहन करून नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे, प्राजक्ता तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले.

शेजारच्या जिल्ह्यातील एका साखर सम्राटाने जिल्ह्याची पूर्ण वाट लावली

आमदार सुनील कर्जतकर म्हणाले, एकेकाळी अहिल्यानगर जिल्हा हा राजकीय दृष्ट्या राज्यातील बलाढ्य जिल्हा होता, राज्यातील राजकारण हलवणारे उत्तुंग बलाढ्य नेते जिल्ह्यात होते, पण शेजारच्या जिल्ह्यातील एका साखर सम्राटाने जिल्ह्याची पूर्ण वाट लावली. आता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या कामातून जिल्ह्याचे प्रतिष्ठा व वजन वाढवून जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करावे, त्या राजकीय डीएनए ला फुंकर घालण्याचे काम करा, असे सांगून भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट देऊन दिलेल्या सुखद धक्क्याच्या घटना क्रमाची माहिती त्यांनी दिली.

यावेळी अक्षय कर्डिले, विवेक कोल्हे यांनीही मनोगत व्यक्त करून संधी दिल्याबद्दल पक्षाचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले .शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी आभार मानले.