
Social Welfare Department : नगर : तृतीयपंथी व्यक्तींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केले.
नक्की वाचा : ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
यांची उपस्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथी व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेश उगले, लैला गुरु नगरवाले, दिशा पिंकी शेख, किरण नेटके, चंद्रकांत काळोखे, ॲड. अनुराधा येवले, डॉ. विक्रम पानसंबळ, शिवाजी जाधव, दिलावर शेख तसेच मोठ्या संख्येने तृतीयपंथी व्यक्ती उपस्थित होत्या.
हेही पहा : चिमुरड्याचा प्रशासकीय आणि खाजगी बेजबाबदारपणामुळे गेला जीव!
योजनांचा लाभ घ्या (Social Welfare Department)
सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार म्हणाले की, तृतीयपंथी व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. समाज कल्याण विभागामार्फत आर्थिक, शैक्षणिक, स्वयंरोजगार आणि सामाजिक सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन ‘बीज भांडवल योजनेसह’ शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शासनाचे सर्व विभाग समन्वयाने कार्यरत असून, या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेश उगले यांनी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. ॲड. अनुराधा येवले यांनी तृतीयपंथी व्यक्तींच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध मोफत कायदेशीर सहाय्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


