Saved lives : आशा स्वयंसेविकेच्या पतीमुळे वाचले चिमुरडीचे प्राण; श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील घटना 

पाय घसरल्याने 'ती' शेततळ्यात पडली

0
Saved lives : आशा स्वयंसेविकेच्या पतीमुळे वाचले चिमुरडीचे प्राण; श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील घटना
Saved lives : आशा स्वयंसेविकेच्या पतीमुळे वाचले चिमुरडीचे प्राण; श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील घटना

Saved lives : श्रीगोंदा : कोळगाव येथील जुनीवाडी भागात शेततळ्यात (Farm Pond) बुडणाऱ्या बाळासाहेब वेठेकर यांच्या लहान नातीला आशा स्वयंसेविकेचे (ASHA volunteer) पती बाळासाहेब मुरलीधर साबळे यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून सुखरूप बाहेर काढले (Saved lives).

नक्की वाचा : कर्जतच्या सत्तासंघर्षास उच्च न्यायालयात पूर्णविराम; सतीश पाटील गटनेते पदावर कायम

पाय घसरल्याने ‘ती’ शेततळ्यात पडली

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुधवार (ता. १) कोळगाव येथील जुनीवाडी भागात शासनाच्या मोहिमेअंतर्गत पोलिओ लसीकरणाचे सर्वेक्षण सुरू होते. या भागातील आशा स्वयंसेविका छाया साबळे या घरोघरी जाऊन लहान मुलांची माहिती घेत होत्या. त्यांच्या सोबत असणारे त्यांचे पती बाळासाहेब मुरलीधर साबळे हे देखील परिसरातच थांबले होते. दुपारच्या सुमारास, परिसरातील बाळासाहेब वेठेकर यांची लहान नात घराशेजारी खेळत असताना जवळच असलेल्या शेततळ्याच्या बाजूला गेली. पाय घसरल्याने ती थेट खोल शेततळ्यात पडली. पाण्याचा अंदाज नसल्याने ती बुडू लागली आणि जिवाच्या आकांताने हातपाय मारू लागली. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेततळ्याच्या दिशेने धाव (Saved lives)

मुलगी पाण्यात बुडत असल्याचे आणि तेथून मदतीसाठी आवाज येत असल्याचे परिसरात उपस्थित असलेल्या बाळासाहेब साबळे यांच्या निदर्शनास आले. शेततळ्यात चिमुरडीला बुडताना पाहून कसलाही विचार न करता त्यांनी थेट शेततळ्याच्या दिशेने धाव घेतली.शेततळ्यातील प्लास्टिकचे आवरण (प्लास्टिक कागद) अत्यंत घसरडे असते, त्यामुळे तिथे उतरणे आणि कोणाला बाहेर काढणे अत्यंत धोक्याचे असते. मात्र, समोर एका लहान जिवाचा खेळ संपत चाललाय हे पाहून बाळासाहेबांनी प्राणाची बाजी लावली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि प्रसंगावधान राखून त्या मुलीला पाण्याबाहेर काढले. वेळेत पाण्याबाहेर काढल्यामुळे आणि प्राथमिक उपचार केल्यामुळे चिमुरडीचे प्राण वाचले आहेत. सध्या तिची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचे समजते.

जर बाळासाहेबांनी आणखी काही सेकंद उशीर केला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. आपल्या लाडक्या नातीला सुखरूप पाहून वेठेकर कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.