Award Nominations : ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी नामांकनास प्रारंभ

0
Award Nominations : ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी नामांकनास प्रारंभ
Award Nominations : ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी नामांकनास प्रारंभ

Award Nominations : नगर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यस्तरीय ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-२०२६’साठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून ग्रामीण भागात उद्योग उभारून रोजगारनिर्मितीत उल्लेखनीय काम करणाऱ्या यशस्वी उद्योजकांनी २८ जुलै २०२६ पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अहिल्यानगर यांनी केले आहे.

नक्की वाचा : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार

ग्रामीण उद्योगांना चालना

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने शासकीय योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेऊन यशस्वी उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन व सन्मान मिळावा, तसेच ग्रामीण उद्योगांना चालना मिळावी या उद्देशाने ही पुरस्कार योजना सुरू केली आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

नक्की पहा : पंढरपूरच्या यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; भाविकांसाठी २३० जादा बसचे नियोजन

इथे करा अर्ज (Award Nominations) 

उद्योगांच्या वृद्धीस चालना मिळावी, नव्या रोजगार संधी निर्माण व्हाव्यात व ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सन २०२३ पासून राज्यस्तरावर ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योगात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या उद्योजकांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जाणार आहे. नामांकन अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयातूनही अर्ज मिळू शकतात. इच्छुक उद्योजकांनी आवश्यक कागदपत्रांसह २८ जुलै २०२६ पूर्वी जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयात अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा ग्रामोद्योग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.