Beed-Pune Railway : मध्य रेल्वे बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करणार

Beed-Pune Railway : मध्य रेल्वे बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करणार

0
Beed-Pune Railway : मध्य रेल्वे बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करणार
Beed-Pune Railway : मध्य रेल्वे बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करणार

Beed-Pune Railway : महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दिनांक १७.०९.२०२६ रोजी बीड-पुणे (Beed-Pune Railway) उद्घाटनपर विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाईल.

बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा

मराठवाडा विभाग आणि पुणे यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी, मध्य रेल्वे बीड आणि पुणे दरम्यान पहिली दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बीड रेल्वे स्थानकावरून गाडीला हिरवा झेंडा (Beed-Pune Railway)

महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, माननीय खासदार श्री. बजरंग सोनवणे, माननीय आमदार श्री संदीप क्षीरसागर आणि इतर मान्यवर दिनांक १७.०९.२०२६ रोजी बीड रेल्वे स्थानकावरून बीड-पुणे उद्घाटनपर विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.

बीड ते पुणे धावणारी बीड-पुणे उद्घाटनपर विशेष गाडी (गाडी क्र. ०१४०१) खालील स्थानकांवर थांबेल. अमळनेर भांड्याचे, नवीन आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाईन आणि उरुळी.ही गाडी खालील डब्यांच्या संरचनेसह धावेल: २ वातानुकूलित द्वितीय, ३ वातानुकूलित तृतीय, ४ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

पुणे-बीड-पुणे दैनंदिन एक्सप्रेस (गाडी क्र. ११४३४/११४३३) ची नियमित सेवा लवकरच सुरू होईल. याच्या वेळा आणि थांब्यांची तपशीलवार माहिती स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.

अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर-बीड विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरू होणारी ही रेल्वे सेवा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

बीड:
बीड हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील एक ऐतिहासिक जिल्हा आहे, जो आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखला जातो. या शहरात ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर आहे आणि हे शहर परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग व अंबाजोगाई यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या जवळ आहे. हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्रधान आहे आणि ही नवीन रेल्वे जोडणी या भागातील लोकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करते.

पुणे:
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाणारे पुणे हे एक प्रमुख शैक्षणिक, औद्योगिक आणि माहिती-तंत्रज्ञान केंद्र आहे. हे शहर मराठवाडा व इतर प्रदेशांना पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. बीड जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, व्यावसायिक, व्यापारी आणि पर्यटक या शहराकडे आकर्षित होतात.

नवीन रेल्वे सेवेचे फायदे:
१. पहिली थेट रेल्वे जोडणी: बीडला पुण्याशी जोडणारी ही पहिलीच थेट रेल्वे सेवा असेल, ज्यामुळे हा ‘आकांक्षी जिल्हा’ भारताच्या प्रवासी रेल्वे नकाशावर येईल.

२. प्रवाशांसाठी सोय: शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय उपचार आणि तीर्थयात्रेसाठी पुण्याला प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, रोजचे प्रवासी, व्यापारी, भाविक आणि रुग्ण यांना याचा मोठा फायदा होईल.

३. सामाजिक-आर्थिक चालना: ही रेल्वे जलद, सुरक्षित आणि किफायतशीर वाहतूक सुविधा देईल. रस्तेमार्गाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ वाचवेल तसेच स्थानिक अर्थव्यवस्था व पर्यटनाला चालना देईल आणि कृषी उत्पादनांची ने-आण सुलभ करेल.

४. प्रादेशिक एकात्मता बळकटीकरण: ही सेवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील एकात्मता अधिक दृढ करेल आणि पुण्यामार्फत देशाच्या इतर भागांशी संपर्क साधण्यास मदत करेल.

मध्य रेल्वे मराठवाडा क्षेत्रातील रेल्वे संपर्क व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक व परवडणारा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. बीड आणि पुणे दरम्यान सुरू होणारी ही नवीन सेवा या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे मराठवाडा-पुणे पट्ट्यातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होईल.

दिनांक: १६ सप्टेंबर २०२६
प्र. प. क्र.: २०२६/०९/२४
सदर पत्रक जनसंपर्क विभाग, मुख्यालय, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here