Murder : नगर : नगर कल्याण रस्त्यावरील कवडे मळा परिसरात घडलेल्या लक्ष्मण मार्तंड काळे यांच्या खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) अवघ्या २४ तासांत छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून हा खून (Murder) झाल्याची प्राथमिक कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली. बाबा राहुल वैराळ (वय १९), करण विशाल शिंदे (वय १८), गणेश उर्फ गणीबाबा मनोज चावरे (वय २२) आणि विशाल उर्फ रानटी रामचंद्र उमाप (वय १८), ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अज्ञात व्यक्तींनी कुऱ्हाडीने वार करून केली हाेती हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेगाव-अमरापूर (ता. शेवगाव) येथील रहिवासी लक्ष्मण मार्तंड काळे हे कवडे मळा रोड परिसरातील शेडमध्ये वास्तव्यास होते. १५ जूनच्या रात्री ते १६ जूनच्या पहाटे दरम्यान अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. तसेच शेजारी झोपलेल्या महिलेवरही हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली (Murder)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तपासाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान हा गुन्हा विळद परिसरातील काही तरुणांनी मिळून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार देहेरे शिवारातील खंडोबाच्या मळ्यात छापा टाकण्यात आला. तेथे संशयास्पदरीत्या थांबलेल्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान मुख्य आरोपी लक्की वैराळ याने साथीदारांच्या मदतीने जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित आरोपींकडून एक मोबाईल फोन व सिमकार्ड असा सुमारे २० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.



