Murum Upsha : नगर : तालुक्यातील दरेवाडी (Darewadi) येथील पाझर तलावातून (percolation Tank) गाळ काढण्याच्या नावाखाली मुरमाची चोरी होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र बेरड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी तलाठी तसेच तहसिल कार्यालयात तक्रात दाखल केली असून जिल्हा प्रशासनाकडून मुरम उपशासाठी (Murum Upsha) कुठलीही परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
नगर : पारनेरच्या चेतन रेपाळेची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी; आग्रा येथे कांस्यपदकाची कमाई
तलाठी व तहसील कार्यालयात तक्रार दाखल
सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील दरेवाडी येथील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या नावाखाली मुरमाचा बेकायदेशीर उपसा होत असल्याचा आरोप बेरड यांनी सोशल मिडियाद्वारे केला. यासंदर्भात त्यांनी तलाठी व तहसील कार्यालयात रीतसर तक्रार देखील दिल्याचे त्यांनी व्हिडिओतून सांगितले. जोपर्यंत या प्रकरणाची तपासणी होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जिल्हा प्रशासनाकडून खुलासा (Murum Upsha)
यावेळी जिल्हा प्रशासनाकडून देखील या विषयावर खुलासा करण्यात आला आहे. दरेवाडी येथील मुरूम उपशासाठी कुठलीही परवानगी प्रशासनाने दिली नसून हा होणारा उपसा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



