
Nagar : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस (IAS) दर्जाच्या कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत लोढा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कार्यक्षम अधिकारी नेमावा
अहिल्यानगर महापालिका स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात देण्यात आले. शहराचा वाढता विस्तार आणि विकासकामे लक्षात घेता, महानगरपालिकेचा कारभार गतिमान राहण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
नक्की पहा : शेवगावात समृद्ध पंचायत राज वाद तापला; अधिकाऱ्यांसाठी तालुक्यातील सरपंच एकवटले
रखडलेल्या विकासकामांना गती (Nagar)
महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांमध्ये सक्षम प्रशासनासाठी आयएएस अधिकारी नियुक्त करण्याचे धोरण आखले आहे. या मागणीमुळे अहिल्यानगर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा होऊन शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


