नगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. गडकरी यांनी १०० टक्के इथेनॉलला (Ethanol Use) हिरवा कंदील दाखवला. केंद्र सरकारकडून मोठा आदेशही इथेनॉल बाबत काढण्यात आला. भारत पेट्रोल-डिझेलसाठी सध्या खाडी देशांवर अवलंबून आहे. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. ज्यामुळे इथेनॉल वापराबाबत सरकारने काही मोठे निर्णय घेतलेत. नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले की, ज्यांना १०० टक्के पेट्रोल (100% Petrol) हवे आहे, त्यांना ते मिळेल. पण त्यासाठी एक अट त्यांनी सांगितली आहे.
नक्की वाचा : रेल्वे प्रवाशांना दिलासा! तिकीट बुकिंग मधील कॅप्चा कोडची कटकट संपणार
इथेनॉल वापराला कडाडून विरोध (Nitin Gadkari)
इथेनॉल वापराला कडाडून विरोधनितीन गडकरी यांच्या इथेनॉल वापराला काही जणांकडून कडाडून विरोध केला जात आहे. हेच नाही तर याच मुद्द्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. पेट्रोल आणि डिझेलसाठी भारताला दरवर्षी किती रुपये मोजावे लागतात, याबाबत त्यांनी थेट आकडेवारीच जाहीर केली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किमतीवर भाष्य करत गडकरी यांनी म्हटले की, इथेनॉलच्या किमती केंद्र सरकार ठरवणार आहे.
अवश्य वाचा : कामगारांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार आर्थिक सहाय्य; फडणवीस सरकारचा निर्णय
लोकांना हवे असेल तर ते १०० टक्के पेट्रोलही घेऊ शकतात… (Nitin Gadkari)
आता इथेनॉलचा विरोध करणाऱ्यांना नितीन गडकरी यांच्या कडून खडेबोल सुनावण्यात आलेत. नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, जर लोकांना हवे असेल तर ते १०० टक्के पेट्रोलही घेऊ शकतात. पण याकरिता त्यांना जास्त पैसे मोजावे लागतील. गडकरी यांनी म्हटले की, २० टक्के इथेनॉल ब्लॅडिंगचे टार्गेट यशस्वी झाले आहे.
E २० इंधन आज पूर्ण देशात उपलब्ध आहे. जर लोकांना इथेनॉल मिक्स पेट्रोल नको असेल तर त्यांना १०० टक्के असलेले पेट्रोलही मिळेल. पण त्यांना याकरिता पैसे अधिकचे मोजावे लागतील. IIT कानपूरचे म्हणणे आहे की, E २० इंधनाने चालणाऱ्या कोणत्याही गाड्यांना काहीही समस्या आली नाही. हेच नाही तर E २० इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना मायलेजचा काही प्रॉब्लेम आला नाही.
संशोधनकर्त्यांनी स्पष्ट केले की, E२० वर चालणाऱ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारची समस्या आली नाही. यासोबतच नितीन गडकरी यांनी E२० वर चालणाऱ्या गाड्यांना काही समस्या असेल तर कळवण्याचे आवाहनही केले होते. मात्र, एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे गडकरींनी म्हटले.



