Sangram Jagtap | नगर : ज्या जिहादी प्रवृत्तीमुळे आपल्या भगिनीला जीव गमवावा लागला, त्या मुख्य आरोपीला तर शिक्षा होईलच; पण या गुन्ह्यात पडद्यामागून त्याला साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची नावे शोधून त्यांना शेवगावमधून कायमचे हद्दपार करा. अशा प्रवृत्तींना या मातीत राहण्याचा किंवा मृत्यूनंतर इथे दफन होण्याचाही अधिकार नाही, असे मत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी व्यक्त केले.
लग्नासाठी दबाव टाकल्याने मुलीने आत्महत्या (Sangram Jagtap)
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सोहेल शेख याने एका अल्पवयीन हिंदू मुलीला धर्मांतरण करून लग्नासाठी दबाव टाकल्याने मुलीने आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल हिंदू समाज, शेवगावच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप बोलत होते. या आंदोलना दरम्यान उपस्थित प्रमुख वक्त्यांनी आरोपींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
अवश्य वाचा – पुणे- नाशिक रेल्वे मार्ग सरळ होणे अत्यंत गरजेचे : बाळासाहेब थोरात
थेट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे (Sangram Jagtap)
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, पीडित चिमुकलीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला केवळ सामान्य शिक्षा न होता थेट फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. लव्ह जिहाद आणि धर्मांतराविरोधातील हा लढा केवळ या मोर्चापुरता मर्यादित नसून तो पुढेही असाच सुरू राहील. तसेच शेवगाव परिसरातील अवैध गुटखा विक्री आणि इतर बेकायदेशीर धंदे, जे या समाजकंटकांकडून चालवले जातात, त्यावर प्रशासनाने तात्काळ पूर्ण बंदी घालावी.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नानासाहेब वाघमारे म्हणाले, लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून आपल्या अनेक हिंदू मुलींना जीव गमवावा लागत आहे. आता फक्त मोर्चे काढून थांबण्याची वेळ राहिलेली नाही, तर अशा प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. सागर बेग यांनी राष्ट्रीय श्रीराम संघटनेच्या वतीने पीडित कुटुंबाला आधार म्हणून ५१,००० रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. तसेच सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमार्फत पीडित कुटुंबाला जीवनावश्यक किराणा सामग्री घरपोच देऊन मदत सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.



