Homeट्रेंडिंगSujay Vikhe Patil : खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून नगरसाठी १ काेटी ४०...

Sujay Vikhe Patil : खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून नगरसाठी १ काेटी ४० लाखांचा निधी

Sujay Vikhe Patil : नगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या स्थानिक विकास निधीतून (Local Development Fund) नगर शहरातील विकास कामांकरिता भरघोस निधी प्राप्त झाला आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये खासदार निधीतून ९० लाख आणि पर्यटन विकास (Tourism development) मधून ५० लाख, असा एकूण एक कोटी ४० लाखाचा भरीव निधी विविध ठिकाणी सभामंडपाच्या बांधकामांसाठी मंजूर झाला आहे.

हे देखील वाचा : शिक्षकांचा वंचिताची दिवाळी उपक्रम प्रेरणादायी – अण्णा हजारे

खासदार निधीतून प्रभाग क्र. २ येथील वैष्णवी माता मंदिर, प्रभाग क्र. ७ मधील विजयनगर येथे मारुती मंदिर परिसर, प्रभाग क्र. ८ मध्ये दातरंगे मळा येथील पर्जनेश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. ५ मध्ये समता चौक येथील हनुमान व महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. ९ मध्ये सिद्धी बागेतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. १६ मध्ये शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, प्रभाग क्र. १६ मध्ये ओंकार नगर येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. १६ मध्ये विश्वनराजे मराठा मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये शास्त्रीनगर येथील श्री दत्त मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये मोहिनीनगर येथील श्री गणपती मंदिर आदी ठिकाणी आणि पर्यटन विकासमधून प्रभाग क्र. १६ मध्ये बालाजी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, प्रभाग क्र. १६ मध्ये पाच गोडाऊन येथील दत्त मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये एकता कॉलनी देवी रोड येथील गणपती मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये मोहिनी नगर पाण्याची टाकी येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये शास्त्रीनगर येथील हनुमान मंदिर आदी ठिकाणी सभामंडप बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

नक्की वाचा : नगरमध्ये रंगणार खुली बुद्धिबळ स्पर्धा; राज्यातून तीनशे खेळाडू येणार

यावेळी आभार कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खासदार सुजय विखे यांनी एक लोकप्रतिनिधी या नात्याने विविध विकासकामांसाठी सदैव कटिबद्ध आहे. यापुढेही अशा अनेकविध कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील भूमिका पार पाडेल, असे सांगून उपस्थित सर्वांचे आभार मानले. जिल्हा शहराध्यक्ष अभय आगरकर, नगर दक्षिण लोकसभा प्रमुख बाबासाहेब वाकळे, नगर विधानसभा निवडणूक प्रमुख मिलिंद गंधे, युवा मोर्चाध्यक्ष मयूर बोचुघोळ, महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, ओबीसी सेल अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य विवेक नाईक आदी उपस्थित हाेते.

आणखी वाचा

वेब स्टोरीज

- Advertisment -
Google search engine

ताज्या बातम्या

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर फोटोंमुळे चर्चेत योग दिनानिमित्त अमृताने दिल्या खास टिप्स ! रंगात रंगुनी रंग माझा वेगळा शिवाली परबचा साडीवाला लूक मेधा शंकरचा घागरातील लूक