Work stoppage movement: विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; पाथर्डी तहसीलसमोर निदर्शने 

महसूल कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

0

Work stoppage movement: पाथर्डी: जुनी पेन्शन तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत २१ एप्रिलपासून बेमुदत संप (Work stoppage movement) सुरू केला आहे. पाथर्डी तहसील कार्यालय समोर सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी एकजुटी होऊन निदर्शने केली. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असे यावेळी महसूल तालुका संघटनेचे अध्यक्ष दिपक मिरपगार, ग्राम महसूल अधिकारी जालिंदर सांगळे यांनी संघटनेच्या वतीने सरकार दरबारी मागणी केली आहे. अहिल्यानगर जिल्हा राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

अवश्य वाचा- कर्जतमध्ये शिलाई मशिन घोटाळा; ४३९ महिलांची लाखोंची फसवणूक

शासनाने निर्णय घेतला तरी अंमलबजावणी रखडलेली (Work stoppage movement)

संघटनेच्या म्हणण्यानुसार, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (RNPS) लागू करण्याचा शासनाने निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्यापही रखडलेली आहे. परिणामी, १ मार्च २०२४ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्ती वेतनही मिळालेले नाही, ज्यामुळे त्यांची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे.कर्मचारी नेत्यांनी सांगितले की, पूर्वीच्या आंदोलनांमधून काही सकारात्मक निर्णय मिळाले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत शासनाकडून चालढकल सुरू आहे. राज्यात एन पी एस, आर एन पी एस आणि यु पी एस या तीन योजनांपैकी पर्याय देण्यात आला असला तरी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अधिक सुरक्षित आणि लाभदायक असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. मात्र, ही योजना लागू करण्यास होत असलेला विलंब हा आंदोलनाचा मुख्य मुद्दा ठरला आहे.

नक्की वाचा-  संगमनेर येथे बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न

महसूल कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय (Work stoppage movement)

दरम्यान, महसूल कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी. कंत्राटी, अंशकालीन व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात.गट-ड पदे रद्द करू नयेत व भरतीवरील बंदी उठवावी.सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात. विनाअट अनुकंपा तत्वावर नियुक्त्या द्याव्यात, खाजगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध आणि निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे अशा प्रमुख मागण्या ठेवण्यात आले आहे. रवींद्र शेकटकर,दीपक कदम,वैभव कराड, प्रदीप मगर, इब्राहिम इनामदार, बाळासाहेब केदार, सचिन लोहोकरे, सतीश थारकर, दादासाहेब वावरे,संदीप बडे,स्नेहा माळी,रेखा डोळे, रमेश हूलमुखे,विनोद भिंगारदिवे, भागवत ढाकणे,संतोष नवले आदींसह मोठ्या प्रमाणात कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. संपामुळे विविध कामांसाठी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. विविध कामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.