Kopragaon : कोपरगाव : शहरातील प्रभाग क्र 3 सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर सभामंडप बांधकाम व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन दरम्यान कोल्हे गट व काळे गट आमने सामने आले असून दोन्ही गटात जोरदार वादंग झाल्याची खळबळजनक घटना आज अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर घडली आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांच्या बांधावर अक्षय कर्डिले; कांदा उत्पादकांशी थेट संवाद
तणावाचे वातावरण (Kopragaon)
या भूमिपूजन सोहळ्याला गालबोट लागले असून यावेळी जागेच्या तसेच आमंत्रणाच्या मुद्द्यावरून काळे व कोल्हे गटात शाब्दिक वादंग होऊन नंतर याठिकाणी धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर सर्व प्रकार युवनेते विवेक कोल्हे यांच्या समोरच घडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन होत असून काळे व कोल्हे गटात शाब्दिक शीतयुद्ध सुरू होते मात्र आज याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. या वादा दरम्यान स्वामी समर्थ महाराजांची आरती सुरू झाल्याने दोन्ही गटाला सुबुद्धी सुचली आणि वाद मिटला आहे.
आरती नंतर युवानेते विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते फलकाचे उदघाटन संपन्न झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत करत पुढील कार्यक्रम तातडीने उदघाटन करून आटोपता घेण्यात आला होता.
नक्की पहा : श्रीमंतीची शर्यत : गौतम अदानी आशियात नंबर वन
दोन्ही गटाकडून निषेध (Kopragaon)
यावेळी दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया देताना झालेल्या घटनेचा निषेध करत आरोप प्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान आज एकाच वेळी काळे गट व कोल्हे गटाच्या वतीने या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे बॅनरबाजी करत समोरासमोर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन भिडल्याचे पहावयास मिळाले. या घटनेनंतर येणाऱ्या काळात श्रेय वादाची लढाई अजून तीव्र होण्याची दाट शक्यता पहावयास मिळत असून ऐन उन्हाळ्यात कोपरगावात राजकीय वातावरण तापल्याचे पहावयास मिळत आहे.



