Amol Khatal : टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ

परमेश्वराच्या कृपेने माझी लोक प्रतिनिधी म्हणून निवड

0
Amol Khatal : टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ
Amol Khatal : टँकरमुक्त तालुका करण्यासाठी कटिबद्ध : खताळ

Amol Khatal : संगमनेर : “सर्वसामान्य जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मिळालेली साथ हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावर पठार भागासह संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि मी कटिबद्ध आहोत. लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली उतरवण्यासाठी टँकरमुक्त (Tanker-Free) संगमनेर तालुका करणार, असल्याचा विश्वास” आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा : राहाता नगरपालिकेत नागरीसेवा दिनाचे आयोजन

परमेश्वराच्या कृपेने माझी लोक प्रतिनिधी म्हणून निवड

संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता श्रावण महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, “तालुक्यातील मायबाप जनतेने परमेश्वराच्या कृपेने माझी लोक प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग असल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सोडवण्याचे काम माझ्या हातून होईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तो पर्यंत मी शांत बसणार नाही.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आमच्या परिवारावर वारकरी संप्रदायाचे संस्कार (Amol Khatal)

“माझ्या कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. माझी आई पंढरपूर, देहू, आळंदी आणि त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असते. त्यामुळे आमच्या परिवारावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले आहेत. मी आज जे काही बोलत आहे ते या संस्कारांमुळेच बोलत आहे. आई-वडिलांचे पुण्य माझ्या कामाला आले असून माझा पिंड राजकारणापेक्षा अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाकडे अधिक आहे.”जीवनामध्ये कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजासाठी प्रत्येकाने चांगले कर्म केले पाहिजे. कोणाच्याही वाचून कोणाचे काही थांबत नाही; मात्र, आपल्या हातून कुटुंबाची आणि समाजाची चांगली सेवा झाली पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.