Agriculture Minister : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषिमंत्र्यांचे आवाहन

0
Agriculture Minister : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषिमंत्र्यांचे आवाहन
Agriculture Minister : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषिमंत्र्यांचे आवाहन

Agriculture Minister : नगर : राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी आवाहन केले आहे की, “12 जून ते 15 जून दरम्यानच्या पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. सध्यातरी मराठवाडा आणि खान्देश भागात सर्वदूर पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा योग्य अंदाज घेऊनच पेरणी करावी, घाई करू नये.”

हेही वाचा : रायगड जिल्हा परिषद सदस्याला सोन्याचे आमिष दाखवून लुटणारे गजाआड

अंदाज घेऊन पेरणी

शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या (IMD) अधिकृत अंदाजावर आधारित निर्णय घ्यावा, जमिनीतील ओलावा, पावसाची सातत्यता आणि पुढील काही दिवसांचा अंदाज यांचा विचार करूनच पेरणी करणे अधिक योग्य ठरेल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

नक्की पहा : बेलेश्वर मंदिरात पिंडीच्या विटंबनेचा आरोप; हिंदुत्वादी संघटना आक्रमक

दुबार पेरणीचे संकट (Agriculture Minister

दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीला काही भागांमध्ये अनियमित पाऊस होत असल्याने अनेकदा शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवते. हीच परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे 15 जूननंतर हवामान स्थिर झाल्यावरच पेरणी सुरू करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.