
Superintendent of Police Somnath Gharge : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासनाच्या(Ahilyanagar Police) कारवाईमुळे एकीकडे गुन्हेगारीवर आळा बसताना दिसत असला, तरी दुसरीकडे पोलीस अधीक्षकांच्या (Superintendent of Police Somnath Gharge) बदलीच्या चर्चांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे. मात्र, या धडक कारवाईमुळे काही विशिष्ट घटकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील काही व्यक्तींकडून पोलीस अधीक्षकांची बदली व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अनौपचारिक चर्चांमधून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीवर राजकीय दबाव येतो का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नक्की वाचा : पोलिसात तक्रार केल्याने लोखंडी रॉडने मारहाण; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
अवैध कत्तल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात धडक मोहीम राबवली असून, यात अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात (१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५) तब्बल ६४ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १९४ आरोपींवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून सुमारे ४ कोटी ५० लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१ जानेवारी पासून २० गुन्हे दाखल (Superintendent of Police Somnath Gharge)
याशिवाय चालू वर्षातही कारवाईची तीव्रता कायम ठेवण्यात आली आहे. १ जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत २० गुन्हे दाखल झाले असून ६९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईतून १ कोटी ५८ लाख ५ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गोवंश गुन्ह्यातील आरोपीच्या सहा टोळ्या ३६ आरोपीना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कत्तलखाने बंद पडले आहेत.
विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत अनेक आरोपींवर कठोर कारवाई करत त्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे. तसेच अवैध कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. या सर्व कारवायांमुळे पोलीस प्रशासनाची कडक भूमिका स्पष्ट होत आहे.
मात्र, या धडक कारवाईमुळे काही विशिष्ट घटकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील काही व्यक्तींकडून पोलीस अधीक्षकांची बदली व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अनौपचारिक चर्चांमधून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील निर्णय प्रक्रियेवर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीवर राजकीय दबाव येतो का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एकूणच, एका बाजूला कठोर कारवाईमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसऱ्या बाजूला बदलीच्या चर्चांमुळे जिल्ह्यातील वातावरण अधिकच तापले आहे. आगामी काळात प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


