BJP : नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांना भाजपमध्ये देण्यात आलेला प्रवेश आणि लगचेच दिलेली विधान परिषदेची (Legislative Council) उमेदवारी यावरून भाजपच्या (BJP) निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्या नाराजीला सोशल मीडियातून वाट मोकळी करून दिली आहे. भाजपचे बहुमत असतानाही उमेदवार आयात का? असा त्यांचा आक्षेप असून यासंबंधी सोशल मीडियातून भावना व्यक्त केल्या जात आहेत.
नक्की वाचा : सराईत गुन्हेगार श्रीगोंदा पोलिसांकडून जेरबंद; तीन महिन्यांपासून देत होता चकवा
सायकलवरून गावा-गावात घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार
भाजपच्या ग्रूपमध्येच व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे, भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच जनसंघापासून ते भाजप स्थापनेनंतरच्या कालखंडात नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत सायकलवरून गावा-गावात घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार केला आहे. त्या काळातील सायकल रॅली, प्रचार फेर्या, आणीबाणीच्या काळात अठरा महिने म्हणजे तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात अनेक जुने व निष्ठावंत स्थानबद्ध होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवार आयात करावे लागतात हे दुर्दैव (BJP)
त्या कटू आठवणी आणि त्या परिस्थितीला व संघर्षाला घरादाराची राखरांगोळी होत असतानाही कसे सामोरे जात पक्ष वाढवला, जिवंत ठेवला ह्या स्मृती आजही जुन्या कार्यकर्त्यांच्या समरणात आहेत. या पार्श्वभूमीवर आजही अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे शेकडो जुने व निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष संघटनेचे प्रामाणिकपणे निःस्वार्थी वृत्तीने काम करीत असताना भाजपसारख्या पार्टी विथ डिफ्रन्स…हे ब्रीद गिरवणार्या पक्ष संघटनेला जिल्ह्यात अधिकृत पक्ष सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवार आयात करावे लागतात हे दुर्दैव आहे.
चिन्ह फक्त भाजपचे, पण माणसे मात्र इतर पक्षातील
नगर जिल्ह्यात रक्ताचे पाणी करून पक्ष वाढवला. इतकेच काय तर या सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांची दुसरी-तिसरी पिढी देखील भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षापासून निःस्वार्थी वृत्तीने कार्यरत आहे. त्यांनाही हेतुपुरस्सर केवळ जुने व निष्ठावंत म्हणून की काय, पण पक्ष संघटनेत डावलले जाते हे या कार्यकर्त्यांचे दुर्दैव आहे. जेव्हा फळे चाखायची वेळ आली तेव्हा इतर पक्षातून उमेदवार आयात केले जात आहेत. नगर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांची यादी पाहिली तर फक्त चिन्ह भाजपचे आहे, पण माणसे मात्र सर्व इतर पक्षातील आहेत! आज निष्ठावान कार्यकर्ते काही बोलत नाहीत. पण पक्षाला आगामी काळात नक्कीच पश्चातापाची वेळ येईल हे नक्की !! उद्या सत्ता गेल्यानंतर ही सर्व मंडळी निघून गेल्याशिवाय राहणार नाहीत! पक्षाच्या वरिष्ठांनी याची नोंद घेतली पाहिजे, असे य़ा पोस्टमध्ये म्हटले आहे.



